राज्याच्या गृहमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा : खा.. नारायण राणे
मुंबई : सचिन वाझेला पोलीस दलात आणणं आणि त्याच्याकडून काम करुन घेणं, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर करत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आधी राजीनामा द्यावा, त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केली आहे.
अनिल देशमुख गृहमंत्री पदाचा राजीनामा देणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर बोलताना नारायण राणे यांनी गृहमंत्र्यांच्या आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे. हे सरकार वर्षभर निटपणे कारभार करु शकलं नाही. किती जणांच्या हत्या झाल्या? सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान, पूजा चव्हाणची हत्या झाली. या सगळ्याची चौकशी वाझेकडे होते. तसंच हे सरकार पडलं तर भाजप सरकार स्थापन करेल की नाही हे नंतरची गोष्ट आहे, असं नारायण राणे म्हणाले. राणे यांनी काल देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, असं म्हटलं होतं. दरम्यान, आज गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. त्यामुळे नव्या चर्चांणा उधाण आलं आहे.
शिवसेनेचा, मुख्यमंत्र्यांचा सचिन वाझे या कंपनीला पाठींबा होता. महाराष्ट्र राज्य चालवायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ नाहीत. असमर्थ ठरले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यस्था शिल्लक राहिलेला नाही. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, असं नारायण राणे यांनी गुरुवारी म्हटलं होतं.