इतर

विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त?

परमबीर सिंग यांना सचिन वाझे प्रकरण भोवणार!

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकार डॅमेट कंट्रोल करण्याच्या प्रयत्नात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, रात्री गेल्या उशिरापर्यंत पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक सुरु होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले. अशातच परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन हटवलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री कमी पडल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचाही राजीनामा घेण्याची मागणी विरोधक करत होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री आणि राज्य सरकारचं कामकाज योग्यरित्या सुरु असल्याचं म्हटलंय. तसंच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा मुद्दाही त्यांनी खोडून काढला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्त बदलाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परमबीर सिंग यांच्या जागी विवेक फणसाळकर यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली जाईल, असं सांगण्यात येत आहे.

विवेक फणसाळकर हे 1989च्या बॅचचे अधिकारी आहेत. फणसाळकर यांच्याकडे सध्या ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाचा कारभार आहे. जुलै 2018 मध्ये फणसाळकर यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. परमवीस सिंग यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय झाल्यास त्यांच्या जागी शिवसेनेकडून फणसाळकर यांचं नाव पुढे केलं जाण्याची दाट शक्यता आहे.

राजधानी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी काँग्रेसला रामराम ठोकलेले केरळमध्ये मोठे नेते पीसी चाको यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी पवारांना सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली होणार का? असा प्रश्नही पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी त्याबाबत मी काय सांगणार. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच काय ते सांगू शकतील. हा निर्णय त्यांच्या अखत्यारित येत असल्याचं पवार म्हणाले होते. मात्र, गृहमंत्रीबदलाच्या चर्चेचं पवारांनी खंडन केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button