इतर

राज्यात कोरोनासोबत अवकाळी पावसाचे संकट

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा अंदाज आयएमडी मुंबईने दिला आहे.

आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार बिहार आणि त्याला लागून असणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशच्या पट्ट्यात वादळी वारे तयार होत असल्याचं चित्र आहे. यासोबतच मध्य प्रदेश आणि या राज्याच्या खालच्या बाजूसही अशीच परिस्थिती उदभवली आहे. सदर परिस्थितीमुळे येत्या तीन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि वीजा चमकण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पूर्व आणि मध्य भारतात याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत.

महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा या भागात 11 आणि 12 एप्रिल या दिवसांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. विदर्भातील काही भागात गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. शनिवारी हवामान खात्याकडडून विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर रविवार आणि सोमवार या दिवसांसाठी कोकण, गोवा, विदर्भ या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील हवामान अंशत: ढगाळ आणि कोरडं असेल. हवामानात होणाऱ्या या अनपेक्षित बदलांचा थेट परिणाम आरोग्यावरही दिसून येत आहे. त्यामुळं या आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी असं आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील वातावरणात फरक जाणवत आहे. वाऱ्याचा द्रोणी भाग असल्याने हा बदल जाणवत आहे. यामुळेच येत्या ४ ते ५ दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रति तास इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button