नागपूरमध्ये कोरोना रुग्णालयाला आग; चार जणांचा मृत्यू
नागपूर : नागपुरातील वेल ट्रीट या कोरोना रुग्णालयाला लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. साधारणत: ८.४५ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्याने रुग्णालयात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी पळापळ सुरू केली होती. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आलं.
ही घटना ताजी असतना आता पुन्हा एकदा कोविड रुग्णालयाला आग लागल्याची घटना नागपूर-अमरावती रोडवरील वाडी येथे घडली आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोरोना रुग्णांवर उपचार होत असलेल्या वेल ट्रिट रुग्णालयाला अचानक भीषण आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. सदर रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसह इतर आजारांचे जवळपास ५० रुग्ण देखील उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाडीतील पूजा चेंबर्स इमारतीमध्ये सुरु असलेल्या वेल ट्रिट रुग्णालयामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये अचानक आग लागली. एसीमध्ये बिघाड झाल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान, तिसऱ्या मजल्यावर १७ रुग्ण तर चौथ्या मजल्यावर ५ रुग्णांवर उपचार सुरु होते. तर संपूर्ण रुग्णालयात ५० च्या जवळपास रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच नर्सने एसीजवळील रुग्णांचे बेड हलविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांने रुग्णांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत आगीच्या धुरामुळे श्वास कोंडल्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. तर त्यातील तुळशीराम पाल या रुग्णाचा मृत्यू झाला. याशिवाय दुसऱ्या रुग्णालयात आणताना तीन रुग्ण दगावले. तर रुग्णालयाच्या आयसीयूतील इतरही काही रुग्ण गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रुग्णालय संपूर्णपणे रिकामं करण्यात आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस दाखल झाले असून आग विझविण्याचं काम सुरु आहे. तसंच, या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना तातडीने दुसरीकडे शिफ्ट करण्यात आलं आहे. तर या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. याचबरोबर, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ३ ते ४ रुग्णांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. २७ रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
वेल ट्रीट हे एकूण 30 बेडचं रुग्णालय आहे. 3 रुग्णांना सकाळी डिस्चार्ज देण्यात आला होता. 27 रुग्णांना आता रुग्णवाहिकेतून दुसरीकडे उपचारासाठी नेण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही आग रुग्णालयातील एसीला लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.
भांडूपमधील रुग्णालयाला आग, 10 रुग्णांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी मुंबईतील भांडूपमधल्या एका मॉलमधील रुग्णालायाला भीषण आग लागली होती. त्या आगीत होरपळून 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या रुग्णालयाच्या परवानगीवरुन जोरदार राजकारणही रंगलं होतं. दरम्यान या मॉलला लागलेली आग तब्बल 11 तासांनी आटोक्यात आणली होती. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते.