इतर

नांदेडमध्ये गुरूद्वारा नजीक डीवायएसपीवर जीवघेणा हल्ला, पोलिसांच्या गाड्या फोडल्या

नांदेड : शिख समाजात होळीनिमित्त हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांनी बंदी घालण्यात आली आहे. राज्यात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शीख समजाकडून हल्लाबोलची मिरवणूक काढत कोरोना नियमांची पायामल्ली करण्यात आली. या हल्लाबोल निवडणूकीची परवानगी नाकारल्यामुळे संतप्त तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत ६ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. संतप्त तरुणांनी केलेल्या दगडफेकेत पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. डीवायएसपीवरही जीवघेणा हल्ला झाला आहे. नांदेडमधील वजिराबाद पोलीस ठाण्यात या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. तरुणांनी केलेल्या दगडफेकीनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा प्रशासन आणि पोलीसांनी सचखंड गुरुद्वारा बोर्डाकडून काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मिरवणूकीला विरोध केला होता. कोरोना परिस्थिती वाढत असल्यामुळे मिरवणूक काढू नये अशे आदेश देण्यात आले होते. तसेच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीख समाजाने जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली होती. हल्लाबोल मिरवणूकीला परवानगी नसतानाही शीख समाजाकडून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली होती. यादरम्यान शीख तरुणांनी रस्त्यावर असलेले बॅरिगेड्सची तोडफोड केली होती. तसेच तलवारी काढून शहरात एकच दहशत निर्माण केली होती. यादरम्यान पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ६ ते ७ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बॅरिकेड तोडले, वाहनांची हवा सोडली

संतप्त शीख युवकांनी रस्त्यावर लावलेले बॅरिकेट्स तोडून टाकले, हातात नंग्या तलवारी घेऊन शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. शहरात या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण असून पोलिसांनी हल्लेखोरांची धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर उलट या तरुणांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. हल्लेखोरांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह वाहनांची प्रचंड नासधुस केली. टायरमधील हवा सोडली, काचा फोडल्या. या हल्ल्यात पोलिस अधिक्षकांचे अंगरक्षक दिनेश पांडे, अजय यादव यांच्यासह सहा ते सात पोलिस गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या हल्ल्यातून पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, संदीप शिवले हे थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डाॅ विपीन यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या भागात तणावाचे वातावरण असून पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button