इतर

संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडल्यास लाठीचा प्रसाद; पोलीस महासंचालकांचा इशारा

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. १४४ कल लागू केले असल्यामुळे ५ पेक्षा अधिक जणांनी एकत्र जमू नये, निर्बंधांचे पालन करुन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन मुंबईचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी म्हटले आहे. अत्यावश्यक वाहतुकीसाठी आता पासची गरज नसेल, जिल्ह्यांतर्गत फिरण्यासाठी पासची गरज नसेल तसेच नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी म्हटले आहे. कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करावे तसेच निर्बंधांच्या काळात पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केले आहे.

विनाकारण घराबाहेर पडू नका जर कोणी अत्यावश्यक कारणांसाठी कोणी घराबाहेर पडत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही.

सध्याची परिस्थिती कठीण आहे. विनाकारण घराबाहेर पडल्यास कठोर कारवाई केली जाईल.

विनाकारण दंड घेणार नाही. अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडल्यास कोणालाही पोलिसांकडून त्रास दिला जाणार नाही.

कलम १४४ लागू असताना ५ पेक्षा अधिक जणांनी घराबाहेर पडू नये.

५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र विनाकारण जमत असतील तर त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल.

सार्वजनिक ठिकाणी नासधूस केल्यास कठोर कारवाई केली जाईल.

विनाकारण नियमांचे उल्लंघन केल्यास लाठीचा वापर करण्यात येईल.

पोलीसांना लाठीचा वार करण्याची वेळ आणू नका.

अत्यावश्यक वाहतुकीसाठी पासची गरज नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पासची गरज नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button