इतर
रायपूरमध्ये हॉस्पिटलला आग, ५ जण दगावले

रायपूर : कोरोनाचे संकट कमी होते म्हणून की काय, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये एका हॉस्पिटलला आग लागली आहे. यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. रायपूरच्या पचेडी नाक्याजवळच्या राजधानी हॉस्पिटलमध्ये ही आग लागली आहे. याच हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे पेशेटंही भरती होते.
या हॉस्पिटलमध्ये जवळपास ५० रुग्णांवर उपचार सुरु होते. आयसीयूत शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचं सांगितलं जात आहे. रुग्णांना इतर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. ५ मृतांपैकी एकाचा मृत्यू आगीत भाजल्यानं झाला आहे तर इतर ४ जणांचा मृत्यू ऑक्सिजन सप्लाय बंद पडल्यानं झाला आहे. आगीमुळे रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा बंद पडला होता. पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या टीमनं बचाव कार्य केलं.




