इतर

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी रियाझ काझीला अटक

१६ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्या प्रकरणी आणखी एका पोलिस अधिकाऱ्याला रविवारी नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA- एनआयए) मार्फत अटक करण्यात आली. एपीआय रियाज काझी असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. सचिन वाझे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून रियाज काझी या पोलिस अधिकाऱ्याला ओळखले जाते. दरम्यान, कोर्टाच्या हजेरीदरम्यान तो या प्रकरणातील सूत्रधार असून तपास यंत्रणेने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर, कोर्टाने त्याला १६ एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात दिले आहे.

स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवण्याच्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यासाठी रियाज काझीला रविवारी अटक करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून रियाज काझीची पोलिसांमार्फत चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान रियाज काझी याने सरकारी माफीचा साक्षीदार बनण्याचीही तयारी दर्शवली होती. पण आज एपीआय काझीला एनआयएकडून अटक करण्यात आली. लवकरच त्यालाही एनआयए कोर्टासमोर हजर केले जाऊ शकते. एनआयए कोर्टाने नुकतीच सचिन वाझेला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर लगेचच काही तासातच रियाझ काझीला अटक करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणातील ही दुसरी अटक आहे.

मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटके प्रकरणातच ही अटक एनआयएकडून झाली आहे. रियाज काझीला झालेली आतापर्यंतची ही दुसरी अटक आहे. रियाज काझी हे मुंबईच्या सीआययू युनिटमध्ये पीएसआय म्हणून कार्यरत होते. अंबानीच्या घरासमोर स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरणामध्ये सचिन वाझे यांना पुरावे नष्ट करण्यासाठी मदत केल्याप्रकरणी ही अटक झाल्याने समजते. सचिन वाझे यांच्यासोबत अतिशय जवळून काम करणाऱ्यापैकी स्फोटके प्रकरणामध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यानेच पीएसआय रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. याआधीही अनेकदा एनआयएकडून रियाज काझी यांना संपुर्ण प्रकरणात चौकशीला बोलावण्यात आले होते. त्यामध्ये पुरावे नष्ट करण्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा डीवीआर गायब करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न रियाज काझीकडून झाला होता. पण आतापर्यंत या संपुर्ण प्रकरणात रियाज काझी माफीचा साक्षीदार होईल अशी चर्चा होती. पण आता एनआयएकडून रियाज काझीला अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणामध्ये रियाज काझीला एनआयए कोर्टातही हजर करण्यात येईल असे कळते. कोर्टारसमोर रियाज काझीला माफीचा साक्षीदार होण्याची संधी मिळते, की त्याच्यावर कारवाई होणार हे येत्या दिवसातच स्पष्ट होईल. दरम्यान रियाज काझींकडून आणखी काही जणांची नावेही समोर येतील असेही बोलले जात आहे.

अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांची चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे गृहमंत्रीपदाची खुर्ची सोडवावी लागलेले अनिल देशमुख यांच्या अडचणीत आखणीन वाढ झाली आहे. सीबीआय (CBI)ने आता अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स बजावला असून चौकशी सुरू आहे. यानंतर खुद्द अनिल देशमुख यांना सीबीआय चौकशी सामोर जावे लागणार आहे. माहितीनुसार, दुपारी १२ वाजल्यापासून अनिल देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि एस. कुंदन यांची सध्या मुंबईच्या डीओरडीओच्या गेस्ट हाउसमध्ये चौकशी केली जात असून जबाब नोंदणी सुरू आहे. गेल्या तीन तासांपासून या दोघांची कसून चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय असून १०० कोटींच्या वसूलीमध्ये त्यांचा देखील हात असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button