राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजारांवर कोरोना रुग्ण आढळले
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या १० हजार पार झाली आहे. गेल्या २४ तासांत १० हजार १८७ नव्या वाढ रुग्णांची वाढ झाली असून ४७ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाख ८ हजार ५७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५२ हजार ४४० जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने मेक्सिको, अर्जेंटिना देशाला मागे टाकले आहे.
शनिवारी दिवसभरात राज्यात ६ हजार ८० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २० लाख ६२ हजार ३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३७ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ६७ लाख ७६ हजार ५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२ लाख ८ हजार ५८६ (१३.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख २८ हजार ६७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ५१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच सध्या ९२ हजार ८९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.