एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक नाही!
'आयसीएमआर'च्या नव्या गाईडलाईन्स
नवी दिल्ली : कोरोना दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. तर रोज होत असलेल्या मृत्यूच्या संख्येमुळे एक भीतीदायक चित्र दिसून येत आहे. यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR – आयसीएमआर’) कोरोना चाचणीसंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
‘आयसीएमआर’च्या नव्या गाईडलाईन्स
‘आयसीएमआर’च्या गाईडलाईनमध्ये असे नमूद केले गेले आहे की, जर एखादा व्यक्ती रॅपिड अँटिजेन चाचणी (RAT) किंवा आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही आहे. तसेच प्रयोगशाळांवर वाढणाऱ्या दबावामुळे जर एखादा निरोगी व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल तर आरटीपीसीआर चाचणी करण्यास सूट मिळू शकते. शिवाय सर्व लक्षणे नसलेले लोकं जर प्रवास करत असतील तर त्यांनी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन केलेच पाहिजे.