अर्थ-उद्योग

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेच्या तंत्रज्ञान, डिजिटल, ऑपरेशन्स, एचआर आदी विभागात नवीन नियुक्त्या

मुंबई : इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेने रिटेल अ‍ॅसेट, टेक्नॉलॉजी, डिजिटल, ऑपरेशन्स आणि बँकेचे मानव संसाधन यासारख्या महत्त्वाच्या विभागांना आणखी सक्षम करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती केली. इक्विटास या लघु वित्त बँकेने नुकतीच नारायणन ईस्वरन यांची प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी, वैभव जोशी यांची प्रमुख डिजिटल अधिकारी, पल्लब मुखर्जी यांची प्रमुख लोक अधिकारी, सिबी सेबॅस्टियन यांची ऑपेरेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि रोहित फडके यांची रिटेल अ‍ॅसेट्सचे अध्यक्ष आणि प्रमुख म्हणून नियुक्ती केली.

मुख्य लोक अधिकारी म्हणून पल्लब मुखर्जी हे चेन्नई येथील मुख्य कार्यालयामध्ये नवनियुक्त प्रमुख तंत्रज्ञान अधिकारी नारायणन ईस्वरन, ऑपरेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष सिबी सेबॅस्टियन आणि रिटेल अ‍ॅसेट्सचे अध्यक्ष आणि प्रमुख रोहित फडके यांच्यासमवेत कार्यरत असतील. प्रमुख डिजिटल अधिकारी वैभव जोशी बँकेच्या मुंबई कार्यालयामधून कार्यभार सांभाळतील.

नारायणन ईस्वरन, फडके आणि पल्लब मुखर्जी हे प्रबंधकीय निर्देशक वासुदेवन पी एन यांना रिपोर्ट करतील तर नवनियुक्त प्रमुख डिजिटल अधिकारी वैभव जोशी हे नारायणन ईस्वरन यांना रिपोर्ट करतील. सिबी सेबॅस्टियन ऑपेरेशन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून बँकेच्या सर्व उत्पादनांच्या सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरचे प्रमुख असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button