स्पोर्ट्स

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल; हैदराबादचा सलग तिसरा पराभव

चेन्नई : पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १४व्या हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. आज झालेल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादवर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने १५० धावा केल्या होत्या. हैदराबादने शानदार सुरूवात केली. पण मुंबईच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करत विजय मिळून दिला. मुंबईचा तीन सामन्यातील आणि सलग दुसरा विजय ठरला. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील आज नववा सामना आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने हैदराबादसमोर 151 धावांचं माफक आव्हान उभं केलं होतं. परंतु मुंबईने दिलेलं हे आव्हान हैदराबादच्या संघाला पेलवलं नाही. हैदराबादचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोने अवघ्या 22 चेंडूत 43 धावांची आक्रमक खेळी केली. सोबत कर्धणार डेव्हिड वॉर्नरने 36 धावांचे योगदान दिलं. या दोघांव्यतिरिक्त हैदराबादच्या कोणत्याही फलंदांजाला चमकदार कामगिरी करता आली नाही. परिणामी हैदराबादला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्ट यांनी धमाकेदार सुरूवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकात ६७ धावा केल्या. ही जोडी चांगल्या फॉर्ममध्ये असताना बेयरस्टो हिट विकेट झाला. त्याने २२ चेंडूत ४३ धावा केल्या. त्यानंतर आलेला मनिष पांडे २ धावा करून माघारी परतला. तर हार्दिक पंड्याने एक अफलातून थ्रो करून कर्णधार डेव्हिड वॉर्नरला धावबाद केले. त्याने ३४ चेंडूत ३६ धावा केल्या.

वॉर्नरच्या विकेटनंतर हैदराबादचा डाव गडगडला. मधळ्या फळीतील फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम केले. विराट सिंग ११, अभिषेक शर्मा २ आणि राशिद खान शून्यावर बाद झाले. एका बाजूने विकेट पडत असाना विजय शंकर मात्र लढा देत होता. पण अखेरच्या दोन षटकात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली आणि हैदराबादचा १३७ धावांवर ऑल आउट केला.

हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईला धमाकेदार सुरूवात करून दिली. या दोघांनी ५ षटाकत ४८ धावा केल्या. पण सातव्या षटकात विजय शंकरने रोहित शर्माला ३२ धावांवर बाद केले. त्याने २५ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव १० धावांवर बाद झाला. तर जम बसलेला सलामीवीर डी कॉक ४० धावांवर माघारी परतला. मधळ्या फळीतील इशान किशनला आज धावाच करता आल्या नाहीत. त्याने २१ चेंडूत फक्त १२ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिकला पुन्हा एकदा अपयश आले. तो फक्त ७ धावा करू शकला. अखेरच्या काही षटकात कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला २० षटकात ५ बाद १५० पर्यंत मजल मारता आली. पोलार्डने २२ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह नाबाद ३५ धावा केल्या.हैदराबादकडून विजय शंकरने २ तर मुजिबने दोन विकेट घेतल्या. खलिद अहमदने एक विकेट घेतली.

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा संघ गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर होता. या विजयासह मुंबईने गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली आहे. RCB पहिल्या तर CSK दुसऱ्या स्थानावर होता. आजच्या विजयासह मुंबई इंडियन्सचे ३ लढतीत दोन विजय आणि एका पराभवासह ४ गुण झाले आहेत. तर त्यांची सरासरी प्लस ०.३६७ इतकी आहे. गुणतक्त्यात आरसीबीचे देखील चार गुण आहेत. त्यांनी दोन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. पण त्यांची सरासरी प्लस ०.१७५ इतकी आहे.

तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज असून त्यांनी दोन पैकी एक विजय एक पराभवासह दोन गुण मिळवले आहेत. त्यांची सरासरी प्लस ०६१६ इतकी आहे. दिल्ली कॅपिटल्स चौथ्या, राजस्थान रॉयल्स पाचव्या, कोलकाता नाइट रायडर्स सहाव्या, पंजाब किंग्ज सातव्या तर सलग तीन पराभवासह हैदराबादचा संघ अखेरच्या स्थानावर आहे. पंजाब आणि हैदराबाद या दोन्ही संघांची सरासरी वजा आहे.

रोहित शर्मा भारताचा ‘सिक्सर किंग’

रोहित शर्मा २५ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. रोहितला मोठी धावसंख्या करता आली नसली तरी त्याने एक विक्रम स्वत:च्या नावावर केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान रोहितने मिळवला. रोहितने याबाबत धोनीला मागे टाकले. त्याने मुजीब उर रहमानच्या षटाक पाचव्या चेंडूवर षटकार मारून चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. धोनीने आयपीएलमध्ये २१६ षटकार मारले आहेत. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर डीप मीड विकेटच्या दिशेने षटकार मारून त्याने धोनीला मागे टाकले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ३५१ षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर एबी डिव्हिलियर्स असून त्याने २३७ षटकार मारले आहेत. तर रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button