अर्थ-उद्योगमनोरंजनस्पोर्ट्स

कोरोनाविरोधी लढ्यात विराट-अनुष्काची दोन कोटींची मदत

मुंबई : भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि सरकारला मदत करण्यासाठी समाजातील अनेक हात पुढे येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने पुढाकार घेतला आहे.

या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर या दोघांनी एक व्हिडिओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी ७ कोटींचा निधी गोळा करण्यात येणार असून विराट आणि अनुष्काने मिळून दोन कोटींची मदत केली आहे.

https://twitter.com/imVkohli/status/1390532345753522180

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button