पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन
पुणे – पुण्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने उद्यापासून ( शनिवार ) मिनी लॉकडाऊन करण्यात आला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाऊन संदर्भात बैठक पार पडल्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांना माहिती दिली.
पुण्यात काय सुरु, काय बंद?
– सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील.
– मॉल आणि सिनेमा हॉल ७ दिवसांसाठी बंद
– धार्मिक स्थळं बंद ७ दिवसांसाठी बंद
– PMPML बससेवा 7 दिवस बंद, केवळ अत्यावश्यक सेवा सुरु
– आठवडे बाजारही बंद
– लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत
– संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल.
– केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
– होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार
– अत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गोष्टी बंद
– दिवसा जमाव बंदी, रात्री संचार बंदी
– उद्याने सकाळी सुरू रहाणार
– उद्यापासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणारं…
– शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार मात्र परीक्षा वेळेत होणार