अर्थ-उद्योगशिक्षण

आयएसएफसी आणि क्रिसलिस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई : इंडियन स्कूल फायनान्स कंपनी (आयएसएफसी) या बिगर-बँकिंग फायनान्स कंपनीने भारतातील शाळकरी मुलांना अध्ययनासाठीच्या उपाययोजना पुरविणारी अग्रगण्य संस्था क्रिसलिसबरोबर एका सामंजस्य कराराद्वारे भागीदारी केली आहे. संलग्न शाळांना ३६० अंशांतून मदत पुरविणे हे या भागीदारीचे लक्ष्य आहे.

या भागीदारीमुळे शाळांना आपल्या आर्थिक, कामकाजाशी संबंधित आणि शैक्षणिक गरजा पुरविणारी एक वन स्टॉप उपाययोजना मिळणार आहे. या कन्सॉर्टिअममुळे दोन्ही आस्थापनांना सर्वोत्तम सहयोग साधता येईल आणि आपल्या कामात समन्वय साधता येईल. यामुळे त्यांना आपल्यातील सकारात्मक बाबी शिस्तबद्ध पद्धतीने उपयोगात आणता येतील आणि भारतातील अनेक शाळांना देण्यात येणा-या सेवांची व्याप्ती वाढविण्याचे बळ मिळू शकेल. या भागीदारीतून आयएसएफसीला निधीपुरवठ्यासाठी क्रिसलिसच्या १८०० शाळाशी संपर्क साधता येईल आणि मोबदल्यात क्रिसलिसला आयएसएफसी ५००० शाळांचे जग कन्टेन्टसाठी उपलब्ध होईल.

पायाभूत सुविधांमधील सुधारणांच्या माध्यमातून शाळा व इतर शैक्षणिक संस्थांच्या क्षमताविकासासाठी त्यांची मदत करणे व त्यायोगे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा आयएसएफसीचा हेतू आहे. खास शैक्षणिक संस्थांना निधीपुरवठा करण्याच्या व्यवसायात असलेली जगातील ही पहिली उद्योगसंस्था आहे. आयएसएफसीकडून प्रामुख्याने भर दिल्या जाणा-या विषयांमध्ये संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र – परवडण्याजोग्या खासगी शाळा, खासगी शाळा, प्लेस्कूल्स, खासगी पदवी, व्यावसायिक महाविद्यालये, कोचिंग सेंटर्स इत्यादींचा समावेश आहे.

आयएसएफसीचे एमडी आणि सीईओ संदीप विरखरे म्हणाले, समाजाच्या सर्व समस्यांवरचा शिक्षण हा एकच रामबाण उपाय आहे. आयएसएफसीमध्ये या गोष्टीवर आमचा दृढ विश्वास आहे. शैक्षणिक संस्थांना निधीपुरवठा करणारी आमची जगातील पहिली कंपनी आहे आणि या गोष्टीचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो. तळागाळात दडलेल्या मानवी क्षमता विकसित करणे हे एक आगळेवेगळे काम आहे. शिक्षणाच्या माध्यामातून एखाद्या मुलामध्ये दडलेल्या क्षमतांना बाहेर काढण्यासाठी काही महत्त्वाच्या घटकांची आवश्यकता असते. त्यापैकी एक घटक आहे वित्तपुरवठा आणि दुसरा आहे शिक्षणाचा दर्जा. क्रिसलिसबरोबर केलेल्या भागीदारीमुळे आम्ही या कामी वित्तीय योगदान देण्यासाठी सुसज्ज होता येईल आणि दर्जेदार शिक्षणाच्या साथीने एका मोठ्या पटावर आपले काम साकारण्याची कल्पना करता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button