राजकारण

मंदाकिनी खडसेंनाही ‘ईडी’चे समन्स; १४ दिवसांची वेळ मागितली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडी कार्यालयात गुरुवारी तब्बल ९ तास चौकशी झाली. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. खडसेंसोबतच त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने समन्स बजावलं होतं, अशी माहिती समोर येत आहे. मात्र मंदाकिनी यांनी अंमलबजावणी संचलनालयाकडे वेळ वाढवून मागितली आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. एकनाथ खडसेंच्या चौकशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच ७ जुलै रोजी मंदाकिनी यांना हजर राहण्याचे आदेश होते. मात्र त्यांनी निवेदन देऊन १४ दिवसांची वेळ मागितली आहे. परंतु ईडीने त्यांना अजून कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button