सिंधुदुर्ग : ज्यांच्या नेतृत्वाखालील बॅकेत सतीश सावंत काम करत होते ते काय काय काम सांगत होते हे जिल्ह्याला माहित आहे. संस्था उभ्या करायला डोके आणि अक्कल लागते, पण बंद करायला अक्कल लागत नाही, असं म्हणत अजित पवारांना नारायण राणेंना टोला लगावला. खासदार, आमदार होणे सोपे पण बँकेची निवडणूक लढवणे अवघड आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात अग्रेसर आहे असून येथे स्पर्धा मोठी असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
सहकार समृद्धी पॅनेलच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला. शिवराम भाऊ, डी.बी.ढोलम यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकारात पक्षीय राजकारण असता कामा नये. बॅक ही प्रत्येक जिल्ह्याची अर्थिक नाडी असते, असं पवार म्हणाले.
विरोधकांचे राजकीय पाठबळ कसे आहे ते पाहा. दादागिरी दहशतीला घाबरू नका, असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. कर्ज कसे थकवले हे सभासदांनी बघावे. बँकेत चुकीचे वागून चालणार नाही. मात्र निवडणुकीत गाफिल राहू नका असं आवाहनही पवार यांनी केलं. योग्य व्यक्तीच्या हातात बॅक द्या. अन्यथा उस्मानाबाद, नांदेड, बीडसारखी अवस्था सिंधुदुर्ग बँकेचीही होईल, असंही ते म्हणाले. या दरम्यान जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर आठवड्या पूर्वी हल्ला झाला होता. ते हल्ल्यातून बरे झाल्यानंतर अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोकणी माणूस फार विचारपूर्वक मतदान करतो, हा इतिहास आहे. त्यामुळे कुणाच्याही दहशतीला, दबावाला बळी पडू नका. अत्यंत विचारपूर्वक मतदान करा. या बँका चांगल्या चालण्यासाठी आपले बहुमोल असं मत द्या. दोन महिलां मतदान करण्याचा, अनुसूचित जातीजमातीमागास प्रवर्ग, ओबीसी , एनटीला मतदान करण्याचा अधिकार आहे. सतीश सावंत स्वतंत्रपणे उभे आहेत, अश्या प्रकारे महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यात मला स्वारस्य नाही आणि मला कसलाही फायदा उठवायचा नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
शरद पवारांचा आदर्श घ्या : सतेज पाटील
केंद्र सरकारची राज्यातील सहकार खात्यावर वक्रदृष्टी आहे. शरद पवार यांचा आदर्श घेऊन सहकारमध्ये काम केले पाहिजे, असं मत विनायक राऊत यांनी व्यक्त केलं. कुठल्याही परिस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा बॅक जिंकायची आहे. शिवराम भाऊंनी केलेले काम प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. बँकेवर महाविकास आघाडीचेच पॅनेल येईल याचा मला विश्वास आहे, असं सतेज पाटील यावेळी म्हणाले.
अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिलेकडे
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर आहेत. अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये गेले आहेत. यावेळी अजित पवारांनी नारायण राणे यांचा त्यांच्या स्टाईलने समाचार घेतला. त्यांचा हा दौरा नारायण राणे यांना टोलेबाजी करण्यावरून तर चर्चेत राहिलाच मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यात आणखी एक लक्षवेधी घटना घडली ती म्हणजे अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य हे महिला चालकाने केल्याचे दिसून आले. मागे अजित पवार बसतले होते, त्यावेळे स्टेअरिंगवर एक महिला चालक दिसून आली.
तृप्ती मुळीक या पोलिस दलातील महिला चालक अजित पवारांची गाडी चालवताना दिसून आल्या. महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून आले. बेधडक अजितदादांच्या गाडीचे स्टेरिंग एका महिलेच्या हातात बघून सर्वांनाच कौतूक वाटले. उपमुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट चालवणाऱ्या या रणरागिणीने या दौऱ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.