भारताचा इंग्लंडवर एक डाव आणि २५ धावांनी विजय
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या अंतिम सामन्यात धडक

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीत टीम इंडियाचा डाव आणि 25 धावांनी विजय झाला. रविचंद्रन श्विन आणि अक्षर पटेल या फिरकी जोडीने पुन्हा एकदा कमाल केली आहे. या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडने अक्षरशः लोटांगण घातले. इंग्लंडचा दुसरा डाव या फिरकी जोडीने अवघ्या 135 धावांवर गुंडाळला. टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 135 सर्वबाद धावा केल्या. यामुळे इंडियाचा 25 धावा आणि डावाने विजय झाला आहे. टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ ने जिंकत भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या फायनलमध्ये भारत विजेतेपदासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळेल.
अक्षर पटेल आणि आर अश्विन या फिरकी जोडीने कमाल केली आहे. या दोघांनीच इंग्लंडला दुसऱ्या डावात ऑल आऊट केलं. या फिरकी जोडीने प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावा केल्या. भारताकडून रिषभ पंतने सर्वाधिक 101 धावा केल्या. तर यावेळेसही वॉशिंग्टन सुंदर दुर्देवी ठरला. शेपटीच्या फलंदाजांनी चांगली साथ न दिल्याने सुंदर 96 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने कालच्या ७ बाद २९४ धावांच्या पुढे खेळण्यास सुरूवात केली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल मैदानावर होते. या दोघांनी आठव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून संघाला पहिल्या डावात १५०च्या पुढे आघाडी मिळून दिले. पटेल अर्धशतकाच्या आणि सुंदर शतकाच्या जवळ आला असता ही जोडी फुटली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पटेल ४३ धावांवर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा शून्यावर बाद झाला आणि त्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोहम्मद सिराजला बाद करत बेन स्टोक्सने भारताचा ३६५ धावांवर ऑल आउट केला. यात सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. ने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह ५५.१७च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९६ धावा केल्या.
भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद १० अशी केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. तर अश्विनने पुन्हा एकदा बेन स्टोक्सला बकरा केले. त्याने स्टोक्सला शून्यावर माघारी पाठवत इंग्लंची अवस्था ४ बाद ३० अशी केली. पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि ओली पोप हे दोघे काही काळ पिचवर टिकले. दोघांना ३५ धावा करता आल्या. पोपला अक्षरने १५ धावांवर बाद केले. त्याच्या पुढील ओव्हरमध्ये अश्विनने कर्णधार जो रूटला बाद केले आणि भारताच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. रुटने ३० दावा केल्या. तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची अवस्था ६ बाद ६५ अशी झाली होती. त्यानंतर सातव्या विकेटसाठी बेन फोक्स आणि लॉरेंन्स यांनी ४३ धावांची भागिदारी केली. ही जोडी अक्षरने फोडली. स्लीपमध्ये अजिंक्यने एक शानदार कॅच घेत फोक्सला माघारी पाठवले. डोमिनिक बेसला बाद करत अक्षरने इंग्लंडची आठवी विकेट घेतली. दरम्यान लॉरेंन्सने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लंडची नववी विकेट घेतली. अजिंक्य रहाणेचा पुन्हा एकदा शानदार कॅच घेतला.
चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर भारतीय संघाने धमाकेदार कमबॅक केले. चेन्नईतील दुसऱ्या कसोटीत मोठा विजय साकारला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अहमदाबाद येथील डे-नाइट कसोटीत इंग्लंडचा दुसऱ्या दिवशी पराभव करत भारताने २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज या वर्षातील पहिल्या मालिकेत विजय मिळवला.