आयजी इंटरनॅशनलचे भारतात १७ वे नवीन कोल्ड स्टोरेज केंद्र
मुंबई : आयजी इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्या ताज्या फळांच्या आयातदार कंपनीने नवी दिल्लीमध्ये त्यांच्या नवीन कोल्ड स्टोरेज केंद्राच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. ३०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या केंद्रामध्ये ३५०० पॅलेट्स स्टोअर करता येऊ शकतात आणि ० अंश सेल्सिअस ते २ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राखले जाते.
नवीनच उद्घाटन करण्यात आलेले कोल्ड स्टोरेज केंद्र कंपनीचे देशातील १७वे केंद्र आहे. या केंद्रामध्ये रेल्वे साइडिंग आणि ६० एकर कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) आहे, ज्यामुळे कार्यसंचाने एकसंधपणे होते. २०१८ मध्ये कंपनीने मुंबईमध्ये अशाच प्रकारच्या एका केंद्राचे उद्घाटन केले, जे शहरातील चौथे केंद्र होते. यामुळे आयजी इंटरनॅशनल भारतातील दुसरी सर्वात मोठी कोल्ड चेन कंपनी बनली.
आयजी इंटरनॅशनलच्या फायनान्स अॅण्ड ऑपरेशन्सचे संचालक तरूण अरोरा म्हणाले, आम्ही भारतीय ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची ताजी फळे देण्याशी कटिबद्ध आहोत आणि कोल्ड चेन देखरेखीमधील आमचे नेतृत्व आम्हाला ते करण्यास मदत करते. दिल्ली येथील केंद्रामध्ये एकाच वेळी ट्रेन किंवा ट्रक्स पार्क करता येऊ शकतात, ज्यामुळे मापनीय आकारमानांची हाताळणी करता येऊ शकते. आम्हाला जेएम बक्षीच्या डीआयसीटी इनलॅण्ड कंटेनर डेपोमध्ये सुविधा निर्माण करण्याचा आनंद होत आहे आणि उत्सुक देखील आहोत. हे केंद्र सोनेपत येथे धोरणात्मकरित्या स्थित आहे आणि दिल्ली/एनसीआरमधील एक्झिम व स्थानिक कार्गोसाठी कार्यक्षम व किफायतशीर आहे.
दिल्ली व मुंबई व्यतिरिक्त कंपनीच्या इतर कोल्ड चेन सुविधा पनवेल, बेंगळुरू, चेन्नई, गनौर, चंदिगड व अमरावती येथे आहेत. आयजी इंटरनॅशनलचा जेएम बक्षीसोबत सहयोगाने अशाच प्रकारच्या कोल्ड चेन टर्मिनल्सच्या माध्यमातून भारतभरातील उपस्थितीमध्ये वाढ करण्याचा मनसुबा आहे.