फोकस

ठाण्यात मुसळधार पावसाने भिंत कोसळली; पाच गाड्यांसह दुचाकींचेही नुकसान

ठाणे : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबुर आणि विक्रोळी भागात घडलेल्या दुर्घटना ताज्या असतानाच ठाण्यातही भिंत कोसळली. कॉसमॉस इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पाच कार आणि पाच दुचाकींचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा मुल्ला भागातील कॉसमॉस इमातीत ही दुर्घटना घडली. रविवारी रात्रीच्या सुमारास इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. भिंतीचा ढिगारा पडून ५ चारचाकी आणि ५ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाच्या पथकासह जेसीबी दाखल झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अंबरनाथमध्ये शिवमंदिराचा पूल पाण्याखाली

अंबरनाथ शहर आणि परिसरात रविवारी सकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वालधुनी नदीचा प्रवाह प्रचंड वाढला. त्यामुळे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराचा पूल पाण्याखाली गेला होता. अंबरनाथजवळच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला रविवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मोठा प्रवाह आला होता. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात तर या नदीने अक्षरशः रौद्ररुप धारण केलं होतं. नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे वालधुनी नदीवर असलेला शिव मंदिरात जाणारा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे शिवमंदिरात जाणारा रस्ता काही काळासाठी बंद झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button