Top Newsराजकारण

भाजपमधील गळती रोखण्यासाठी ते बोलले असतील; शिवसेनेचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

मुंबई : ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार काम करत आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना पक्षात थांबवण्यासाठी अशा प्रकारची भाषणं करणं गरजेचं असतं, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी भाजपचे नेते अमित शाहांना सणसणीत टोला लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊन निवडणूक लढावी असं आव्हान अमित शाहा यांनी दिलं होतं. त्यांच्या विधानाचा समाचार घेत उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जशास तसे उत्तर दिले. भाजपतली अनेक मंडळी पक्ष सोडून महाविकास आघाडीत येत आहेत. प्रवेशाचा ओघ थांबवण्यासाठी मॉरल सपोर्ट देण्यासाठी, उमेद, ऊर्जा देण्यासाठी केलेलं हे वक्तव्य आहे. ज्या पद्धतीने महाविकास आघाडी काम करत आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांना थांबवण्यासाठी अशा प्रकारची भाषण करणे गरजेचे असते’, असा सणसणीत टोला उदय सामंत यांनी लगवला.

आपण दोन वर्षांपासून यांच्या टिकेबद्दल ऐकतोय. भाजप नेते आले आणि महाविकास आघाडीचे कौतुक केलं अशी अपेक्षा कशी करायची? उद्या असे देखील म्हणतील आलेले पण मॅनेज झाले. या टीकेकडे मी अशा अर्थाने बघतो उत्तर आम्ही मतदारातून देतो आम्ही विकास कामे करून देतो म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून समोर आले आहेत. विरोधकांनी टीका करणारे असलेल्या विरोधकांचे कामच असतं आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील पक्षातील कार्यकर्ते हे दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत ते थांबवण्यासाठी त्यांची उमेद वाढवण्यासाठी हे केलेलं वक्तव्य आहे, असंही सामंत म्हणाले.

अमित शहांना काय म्हणायचे ते मला माहिती नाही त्यांचे पूर्ण भाषण मी ऐकले नाही या सर्वांची उत्तरे उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहेत. दोन वर्षानंतर याचे उत्तर देऊन काही उपयोग नाही. जनतेने उद्धव ठाकरे यांना स्वीकारले आहे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेब ठाकरे चांगले काम करतात ते जनतेच्या ह्रदयात बसले आहेत, असंही सामंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button