ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाणे महापालिकेच्या अनधिकृत फेरीवाल्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘लवकर बरे व्हा, बाकी आम्ही बघतो’ अशा शब्दात राज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना धीर दिला आहे.
यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ‘कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. लवकरं बरे व्हा असे मी सांगायला आलो होतो. दोन गोष्टी पाहणं गरजेचं आहे एक म्हणजे अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले, आमचं आंदोलन होत ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होते. काल म्हटल्याप्रमाणे, जे काही घडलेय त्याचं दुःख आहेच. काळपण सोकावतोय. अशा प्रकारची हिंम्मत ठेचणे गरजेचे आहे. पोलीस कारवाई करतायत. न्यायालयही त्यांच कर्तव्य बजावेल अशी अपेक्षा आणि आशा आहे. त्याला कठोर शिक्षा होईल. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
घोडबंदर भागातील कासारवडवली येथे सोमलवारी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु असताना माजिवाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या अंगरक्षकावरही हल्ला केल्याने त्याच्याही हाताचे एक बोट तुटले आहे. या दोघांवरही ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर भाजी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली आहे.