Top Newsराजकारण

माझ्यावरील टीकेकडे लक्ष देऊ नका; निवडणुकीच्या कामाला लागा :उद्धव ठाकरे

शिवसैनिकांना आवाहन; योग्यवेळी करून दाखवतो, विरोधकांना इशारा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील २२७ शाखाप्रमुख, विभागप्रमुख ,नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत यांनी माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा, अशा सूचना शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागातील झालेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा असा आदेश दिला. मुंबई महापालिकेनं महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाच्या सहकार्यानं नुकताच मुंबईतील पाचशे स्क्वेअर फुटाचा मालमत्ता कराचा निर्णय आपण घेतलाय तो जनतेपर्यंत पोहोचवा, असा आदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. विकास कामाची पोहोचपावती मिळायला हवी, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे या टीकेला मी शांतपणे घेत असल्याचं सांगितलं. मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे, ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळेला करून दाखवतो. आता येणाऱ्या निवडणुकीसाठी तयारीला लागा मी वेळीच माझ्या कामाने माझी पोहोचपावती देतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

जनतेची कामं करा आणि जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे असा संकल्प करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होर्डिंग बॅनर लावण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचणं गरजेच आहे, असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. मोठ-मोठे बॅनर लावू नका ते जनतेला आवडत नाहीत, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साडेदहा वाजता सुरू झालेली बैठक साडेअकराला संपली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button