राजकारण

भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर

पणजी : भाजपने गोव्यात निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सोमवार, दि. २० रोजी दोन दिवसांच्या दौºयावर गोव्यात दाखल होत आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करण्यासाठी फडणवीस गोवा दौºयावर येत आहेत.

फडणवीस यांच्यासोबत भाजपचे गोवा निवडणुकीचे सहप्रभारी केंद्रीय संस्कृती व पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी तसेच पक्षाचें गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही येणार आहेत. सहप्रभारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा वस्रोद्योगमंत्री दर्शना जार्दोश गोव्यात दाखल झालेल्या आहेत. येत्या चार पाच महिन्यात गोव्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने पक्षाच्या तयारीचा आढावाही घेतला जाईल. फडणवीस तसेच वरील अन्य नेते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच मंत्रीमंडळातील त्यांचे अन्य सहकारी, भाजप आमदार, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधतील. भाजप युवा आघाडी, महिला मोर्चा, ओबीसी विभाग, अल्पसंख्यांक विभाग आदी आघाड्यांबरोबरच बूथ स्तरावरही ते संवाद साधतील.

फडणवीस यांनी बिहार विधानसभेत निवडणूक प्रभारी म्हणून भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. याआधीही अनेकदा ते निवडणुकांच्यावेळी गोव्यात आलेले आहेत आणि निवडणुकीची जबाबदारीही निभावली आहे. त्यांचा हा अनुभव गोवा भाजपला फार उपयोगी पडेल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button