पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांची सायकल वारी
मुंबई : देशात सातत्याने इंधन दरवाढ होत आहे. आतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी असताना देशातील इंधनाचे दर मात्र गगनाला भिडले आहे. केंद्र सरकारने लावलेल्या करामुळे इंधनदरवाढीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी सकाळी १० वाजता सायकलवरुन अधिवेशनासाठी विधान भवनानाकडे रवाना झाले. या सायकल रॅली आंदोलनाला मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सुद्धा हजेरी लावली होती.
केंद्र सरकारने रस्ते विकास आणि इंधन दरवाढ करुन सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरु असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. केंद्र सरकारने केलेल्या जाचक करांचा काँग्रेसकडून निषेध केला जात आहे. केंद्रातल्या मोदी सरकराने ज्या प्रकारे महागाई वाढवण्याचा विक्रम केला आहे. याचा देशभरातून काँग्रेस विरोध करत आहे. या देशाच्या लोकांच्या ताटातलं अन्न हिसकण्याचे काम केंद्राने सुरु केले आहे. याचा विरोध करण्यासाठी कांग्रेसकडून विरोध करण्यासाठी सर्व नेते सायकलने विधानभवनात जाणार आहेत. असे वक्तव्या काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधनावर कर लावणे ही दरोडेखोरी असून केंद्रातील भाजप सरकारने ती थांबवावी या मागणीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह मंत्री व आमदार सायकलने प्रवास करून विधानभवनात पोहोचले आहेत. सध्या पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लिटर १८ रु. सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंडासाठी घेतले जातात. तसेच पेट्रोलवर प्रति लिटर २.५० तर डिझेलवर प्रति लिटर ४ रुपये कृषी सेस घेतला जातो. यासोबतच २००१ ते २०१४ या चौदा वर्षाच्या काळात पेट्रोल डिझेलवर प्रति लिटर १ रुपया सेंट्रल रोड फंड सेस लावला जात होता. २०१८ मध्ये याचे नाव बदलून सेंट्रल रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड करुन १ रूपयांवरून तो १८ रु. प्रतिलिटर केला.
करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर ८२० टक्के तर पेट्रोलवर २५८ टक्के एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये लिटर वर तर डिझेलचे दर ९० रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत.इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेंसह काँग्रेसचे मंत्री व आमदार सायकलवरून विधानभवनात येणार.छोटे व्यापारी, लघु व मध्यम बंद झाल्याने अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच इंधन आणि गॅस दरवाढीमुळे या घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने इंधनावरील अन्यायी करवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिला पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे.