आरोग्य

‘आयएमए’चे माजी अध्यक्ष डॉ. के.के. अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA – आयएमए) माजी अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. के.के. अग्रवाल यांचं कोरोनामुळे निधन झालं. डॉ. के.के. अग्रवाल यांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. अग्रवाल ६२ वर्षांचे होते आणि जवळपास एक आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते.

डॉ. के.के. अग्रवालयांच्या कुटुंबियांनी ट्वीट करुन त्यांच्या निधनाची माहिती दिली. कोरोनाची लागण झाल्यानंतर अग्रवाल यांना राजधानी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. इथे त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. परंतु त्यांना वाचवण्यात अपयश आलं.”

अग्रवाल यांचा मजेशीर व्हीडिओ व्हायरल

यंदाच्या जानेवारी महिन्यात डॉ. के.के. अग्रवाल यांचा एक मजेशीर व्हीडिओ सोशल मीडिया तुफान व्हायरल झाला होता. व्हीडिओमध्ये अग्रवाल यांच्या पत्नी त्यांना ओरडत असल्याचं दिसत होत्या. कारमध्ये लाईव्ह व्हीडिओ करताना केके अग्रवाल यांनी आपण कोरोनाची लस घेतल्याचं सांगितलं. हा लाईव्ह व्हीडिओ पाहून त्यांच्या पत्नीने तातडीने फोन करुन माझ्याशिवाय तुम्ही लस का घेतली, अशी विचारणा करत दम भरला. यावर अग्रवाल यांनी सांगितलं की, मी केवळ तिथे लसीची माहिती घेण्यासाठी गेलो होतो आणि मला लस दिली.

यूट्यूब चॅनलद्वारे आजारांविषयी माहिती आणि सल्ला

डॉ. यांचं यूट्यूब चॅनलही आहे, ज्यावर ते व्हीडिओच्या माध्यमातून कोविड-१९ सह इतर आजारांबाबत लोकांना माहिती आणि सल्ला देत असत. डॉ अग्रवाल यांना सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं होतं. अग्रवाल कार्डिओलॉजिस्ट होते आणि हार्ट केअर फाऊंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते. डॉ. अग्रवाल यांना २०१० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button