जालंधर : पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या विरोधात आज भाजपने ३४ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपचे जातीचं राजकारण डोळ्यासमोर ठेऊन तिकीट वाटप केल्याची भाजपमध्ये चर्चा आहे.
पक्षाने पहिल्या यादीत जातीय समीकरणाची पूर्ण काळजी घेतल्याचे पाहायवयास मिळत आहे. १२ तिकिटे शेतकरी समाजातून आलेल्या उमेदवारांना देण्यात आली आहेत. तसेच १३ शीखही उतरले आहेत, ८ अनुसूचित जातींनाही तिकीट मिळाले असून महिला, डॉक्टरांचीही उपस्थिती पहिल्या यादीत आहे.
पहिल्या यादीतील उमेदवार : जालंधर सेंट्रलमधून – मनोरंजन कालिया, दसुहामधून – रघुनाथ राणा, गडशंकरमधून – नमिषा मेहता, तरनतारनमधून – नवरीत सिंग लवली, मुकेरियातून – जंगलीलाल महाजन, लुधियाना सेंट्रलमधून – गुरुदेव शर्मा, फतेहगढ साहिबमधून – दीदार सिंग भाटी, अमृतसर उत्तरमधून – सरदार सुखविंदर. सिंग पिंटू, हरगोबिंदपूरमधून – बलजिंदर सिंग डकोह, सुजानपूरमधून – दिनेश सिंग बब्बू, चब्बेवालमधून – डॉ.दिलभाग राय, अमलोकसे – कंवर वीर सिंग तोहरा यांना तिकीट देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दुसर्या जागेवरूनही निवडणूक लढवू शकतात, या वस्तुस्थितीवर हरदीप पुरी यांनीही खिल्ली उडवली. कारण त्यांना माहित आहे, की एका जागेवरून निवडणूक लढवून जिंकणार नाही. तसेच चन्नी यांनी आधी नवज्योतसिंग सिद्धूसोबतचे संबंध सुधारावेत, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
पंजाबमध्ये २०० कोटींचे होर्डिंग आले कुठून?, चन्नींचा केजरीवाल यांना सवाल
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, चमकौर साहिबमधून निवडणुकीला सुरुवात करण्यापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी गुरु ग्रंथ साहिबचे अखंड पठण केले आहे. यावेळी चरणजीत सिंग चन्नी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
चरणजीत सिंग चन्नी म्हणाले की, ही माझी चौथी निवडणूक आहे. अरविंद केजरीवाल यांना सांगेन की सीमा ओलांडू नका. त्यांनी आधी सीमा ओलांडली आहे आणि नंतर माफी मागितली आहे. गडकरी, जेटली, मजिठिया यांची माफी मागितली. राजकारणात काही शिष्टाचार असतात की नाही? अरविंद केजरीवाल यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवावे, असे ते म्हणाले.
याचबरोबर, केजरीवाल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी मी पार्टीकडे परवानगी मागितली आहे. होर्डिंग्ज लावायला माझ्याकडे पैसे नाहीत. पंजाबमध्ये केजरीवालांचे २०० कोटींचे होर्डिंग्ज लावले आहेत, प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती सुरू आहेत. हा पैसा येतो कुठून? गोव्यापासून उत्तराखंडपर्यंत केजरीवालांचे होर्डिंग्ज लावले आहेत, हा पैसा येतो कुठून? असे सवाल करत चरणजीत सिंग चन्नी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पुढे म्हणाले की, जेव्हा मी त्यांना काळे इंग्रज म्हणालो, तेव्हा ते म्हणतात की, माझ्याशी संबंध ठेवायचे आहेत का? कोणाच्या तरी ठिकाणी पैसे पकडले. मला का ओढले जात आहे? माझ्या घरातून पैसे पकडले नाहीत, अन्यथा ईडीने माझ्या घरावर छापा टाकला असता. माझ्या घरात पैसे सापडले नाहीत. मला ओढणे योग्य नाही. हे सहन होत नाही. मला मानहानीचा खटला भरावा लागेल. मुख्यमंत्री चेहरा म्हणून प्रोजेक्ट केल्यानंतर, ३ महिने मुख्यमंत्री बनून बरेच काही साध्य केले, असे ईडीच्या छाप्याच्या प्रश्नावर चरणजीत सिंग चन्नी म्हणाले.