Top Newsआरोग्य

केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिटयूटला ६६ कोटी डोसची नवीन आर्डर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरुवारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबरच ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेका कोविड -१९ लस कोविशील्डच्या ६६ कोटी डोसच्या खरेदीसाठी नवी ऑर्डर दिली आहे. सरकार आणि सीरम इन्स्टिट्यूट रेग्युलेटरी डायरेक्टर प्रकाश कुमार सिंह यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सांगितले आहे, की सीरम इन्स्टिट्यूट या महिन्याच्या अखेरपर्यंत २०.२९ कोटी कोविशील्ड लसींचा पुरवठा करण्यास सक्षम आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपली लस निर्मिती क्षमता वाढविली आहे. आता कंपनी दर महिन्याला २० कोटी कोविशील्ड लसी तयार करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुलै महिन्यात भारत बायोटेकला लसीच्या २८.५० कोटी डोसची ऑर्डर दिली होती. मात्र, भारत बायोटेक आतापर्यंत ही ऑर्डर पूर्ण करू शकलेली नाही.

सरकारने १२ मार्चला दिलेल्या ऑर्डरनुसार, भारत बायोटेक कोव्हॅक्सीनचे पाच कोटी डोस देण्याच्या जवळपास आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने ऑगस्ट ते डिसेंबर या काळात कोविशील्डच्या ३७.५० कोटी डोसची ऑर्डर सीरम इन्स्टिट्यूटला दिली होती. ही ऑर्डर कंपनी याच महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण करू शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button