
मुंबई: सिंधुदुर्ग पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावल्याप्रकरणी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले असून, पोलिसांना त्यांनी थेट वकिली भाषेत प्रत्युत्तर देत कायदाच दाखवला आहे.
फडणवीस यांनी एका मागून एक ट्विट करत सिंधुदुर्ग पोलिसांवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते! सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते!
CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.
(1/3)@MeNarayanRane #NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2021
…. आणि असे न केल्यास भाजपा CRPC 156(3) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा IPC 34 अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल !
(3/3)#NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर आयपीसी १६६ए अंतर्गत एफआयआर नोंदविला जावा, अशी आमची मागणी आहे. आणि असे न केल्यास भाजप सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा आयपीसी ३४ अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल!, असे देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? हे कुणालाही माहीत नाही. नितेश राणे कुठे आहेत हे मला माहित नाही आणि मी ते तुम्हाला का सांगू? असे नारायण राणे यांनी म्हटले होते. याचा अप्रत्यक्ष अर्थ नारायण राणे यांना नितेश राणे यांच्यासंदर्भात माहिती तर नाही ना, असाही होत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नारायण राणे यांना नितेश राणे यांच्या संदर्भात विचारणा करत ही नोटीस बजावली असल्याचे समजते.




