राजकारण

खडसेंचे जावई गिरीश चौधरींच्या ईडी कोठडीत वाढ

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांना आणखी चार दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना १९ जुलैपर्यंत ईडी कोठडीत मुक्काम करावा लागणार आहे. गिरीश चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. चौधरी यांना ५ जुलैला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून ते ईडीच्या कोठडीत आहेत.

पुणे येथे २०१६ मध्ये एमआयडीसी जमिनीबाबत घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने ही गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी आज कोर्टात केला. तर या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे ७ दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने १९ जुलैपर्यंत म्हणजे ४ दिवसांची ईडी कोठडी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button