अर्थ-उद्योग

क्लियरद्वारे वित्तीय सेवांचा विस्तार

मुंबई : क्लियर (पूर्वीची क्लियरटॅक्स) या भारतातील सर्वांत मोठ्या फिनटेक सास कंपनीने आज आपण उद्योगांसाठी इन्व्हॉइस डिस्काऊंटिंग उत्पादनाचे अनावरण केल्याची घोषणा केली असून त्याद्वारे एसएमई क्रेडिट आणि बी२बी पेमेंट्समध्ये प्रवेश केला आहे. हे इन्व्हॉइस डिस्काऊंटिंग उत्पादन क्लियरच्या अस्तित्वातील ३००० पेक्षा अधिक उद्योग ग्राहकांना उपलब्ध असेल, जेणेकरून त्यांच्या पुरवठादारांना चालू भांडवल उपाययोजना दिल्या जातील आणि त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल.

क्लियर या जवळपास ३,००० उद्योग आणि ६०० ते हजार एसएमईना सास पूर्तता उत्पादने देणाऱ्या कंपनीने आपले व्यवसाय नेटवर्क जीएसटी, ई-वेबील्स आणि ई- इन्व्हॉयसिंगसोबत बदलताना पाहिले आहे. या प्लॅटफॉर्मवर एकूण ४०० अब्ज डॉलर्सच्या एकूण मूल्यासह (जीटीव्ही) २०० दशलक्षपेक्षा अधिक व्यवसाय इन्व्हॉयसेस आहेत.

क्लियरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले, “आमच्याकडे उद्योगासाठी फिनटेक सासच्या निर्मितीमध्ये मोठा अनुभव आहे. त्यामुळे आम्हाला वातावरणातील एसएमई क्रेडिट आणि बी२बी पेमेंटसाठी तंत्रज्ञानावर आधारित वाढती गरज पूर्ण करणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञान प्रथम पुरवठा साखळी वित्तीय उत्पादने, जी बिलाच्या सवलतींपासून सुरू होतात, त्यातून उद्योग आणि त्यांच्या पुरवठादारांसाठी एक उत्तम अनुभव दिला जाऊ शकेल.”

क्लियरच्या इन्व्हॉइस डिस्काऊंटिंग उत्पादनाची रचना पुरवठादारांना तात्काळ चालू भांडवल आणि रोखता देण्यासाठी केली गेली आहे आणि आर्थिक वर्ष २४ च्या शेवटी ३ अब्ज डॉलर्सवर प्रक्रिया होईल अशी अपेक्षा आहे. स्मार्ट एआय / एमएलवर आधारित प्लॅटफॉर्म ईआरपीला जोडेल आणि एक सवलत दर निवड शक्य करेल जी ग्राहक आणि त्यांच्या पुरवठादार या दोन्हींसाठी स्वीकारार्ह असेल. उद्योग आपल्या सुरूवातीच्या प्रदानांची गरज पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारच्या वित्तपुरवठ्याचे पर्याय निवडू शकता. ते आपल्याकडील अतिरिक्त रोख रक्कम वापरू शकतात किंवा बँकांद्वारे लाइन ऑफ क्रेडिटचा पर्याय निवडू शकतात किंवा क्लियरच्या प्लॅटफॉर्मद्वारे ट्रेड्सच्या मार्केटप्लेसेसचा वापर करू शकतात.

आम्ही व्यापक प्रमाणावर पुरवठा साखळी कार्यान्वित करण्यासाठी बँका आणि एनबीएफसीसोबत भागीदारी करत आहोत आणि त्यासाठी प्रत्यक्ष व्यावसायिक कामगिरीवर आधारित राहून वेगवान, कार्यक्षमतेने किंत लावलेली कर्जे देत आहोत, जी फक्त मालमत्तांच्या मालकीवर नसतील, असे गुप्ता म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button