स्पोर्ट्स

बेअरस्टो, स्टोक्सचा झंझावात; इंग्लंडची भारतावर ६ गडी राखून मात; मालिकेत १-१ बरोबरी

पुणे : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India Vs England 2nd ODI) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला. इंग्लडने या सामन्यात टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतीय संघाने इंग्लंडपुढे 337 धावांचं आव्हान दिलं. या आव्हानाला इंग्लंडच्या फलंदाजांनी धडाकेबाज फलंदाजी करत सहज पूर्ण केलं. त्यामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेयरस्टो याने 112 चेंडूत 124 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोचे शतक, तसेच बेन स्टोक्सने केलेल्या ९९ धावांच्या खेळीमुळे इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ६ विकेट व ३९ चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.

पहिल्या सामन्यात सलामीवीर बेअरस्टोचे शतक केवळ सहा धावांनी हुकले होते. या सामन्यात मात्र त्याने अप्रतिम फलंदाजी करताना ११२ चेंडूत ११ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ११ वे शतक ठरले. त्याला स्टोक्सने ५२ चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९९ धावा करत उत्तम साथ दिली.

भारताने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामीवीर जोडीने जबरदस्त सुरुवात केली. मात्र, अधिक धावा करण्याच्या नादात जेसन रॉय धावबाद झाला. रोहित शर्माने त्याला धावबाद केलं. पण जेसनने 52 चेंडूत 55 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे. जेसन रॉय आणि बेयरस्टो दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

जेसन रॉय धावबाद झाल्यानंतर बेन स्टोक्सने मैदानावर येत जॉनी बेयरस्टोसोबत भागीदारी केली. दोघांनी डाव सावरत जबरदस्त फलंदाजी केली. बेन स्टोक्स आणि बेयरस्टो दोघांनी भारतीय गोलंदाजांना धो धो धुतलं. दरम्यान, बेयस्टोने आपलं शतक पूर्ण केलं. तर बेन स्टोक्स देखील जलद गतीने शतकाच्या दिशेला वाटचाल केली. पण त्याचं शतक पूर्ण होण्यासाठी अवघ्या एका धावाची गरज असताना भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. बेन स्टोक्सने अवघ्या 52 चेंडूत तब्बल 99 धावा केल्या. यामध्ये 4 चौकार तर 10 षटकांचा समावेश आहे.

तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी बेन स्टोक्स मैदानात उतरला. त्याने आपलं अर्धशतक 40 चेंडूमध्ये पूर्ण केलं. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि 4 षटकार निघाले परंतु अर्धशतकानंतर स्टोक्सने गिअर बदलला. टॉप गिअरमध्ये त्याची गाडी निघाली. नंतरच्या 11 बॉलमध्ये त्याने 49 धावा झोडल्या. त्याने भारतीय फिरकीपटू क्रुणाल पांड्या आणि कुलदीप यादवचा पार चोळामोळा करुन टाकला. क्रुणालच्या तर एका ओव्हर्समध्ये त्याने 28 धावा फटकावल्या. बेन स्टोक्सने जॉनी बेअरस्टोच्या साथीने केवळ 114 बॉलमध्ये 175 रन्सची अफलातून पार्टनरशीप रचली. बेन स्टोक्सला शतकासाठी एका धावेची गरज होती. आक्रमक अंदाजात स्टोक्स शतक साजरं करणार, असं सगळ्यांनाच वाटत होतं. भुवी बोलिंग मार्कवर होता. भुवीने स्टोक्सला बाऊन्सर बॉल टाकला. एक धाव घेण्याच्या नादात बॉलने त्याची बॅटची कडा घेतली होती. रिषभ पंतने त्याचं काम न चुकता पूर्ण केलं. पंत आणि भुवीने हलकेसे अपील केले. पंचांनीही क्षणाचाही विलंब न करता आऊट निर्णय दिला. अशा प्रकारे बेन स्टोक्सच्या खेळीचा असा दुर्दैवी शेवट झाला. शतक अवघ्या एका धावेने हुकलं.

बेन स्टोक्स बाद झाल्यानंतर लगेच पुढच्या षटकात जॉनी बेयरस्टो देखील झेलबाद झाला. भारताच्या प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. बेयरस्टोने 112 चेंडूत 124 धावा केल्या. यामध्ये 11 चौकार तर 7 षटकांचा समावेश आहे. बेयरस्टोनंतर लगेच मैदनात उतरलेला जॉस बटलरही स्वस्तार तंबूत परतला. प्रसिद्ध कृष्णाने मोठ्या चालाखीने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर लियम लिविंगस्टो आणि डेव्हिड मलान यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पुढे संयमी खेळी करत या जोडीने इंग्लंडला विजयी केलं. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 2 तर भुवनेश्वर कुमारने 1 विकेट घेतली. भारताने दिलेल्या 337 धावांच्या आव्हानाला पाठलाग करताना इंग्लंडने धमाकेदार सुरुवात केली. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो या सलामीवीर जोडीने जबरदस्त सुरुवात केली. मात्र, अधिक धावा करण्याच्या नादात जेसन रॉय धावबाद झाला. रोहित शर्माने त्याला धावबाद केलं. पण जेसनने 52 चेंडूत 55 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 1 षटकाचा समावेश आहे. जेसन रॉय आणि बेयरस्टो दोघांनी पहिल्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, या सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे दोन्ही सलामवीर स्वस्तात परतले. रोहित शर्मा (25) आणि शिखर धवन (4) त्यांच्या नावाला साजेशी कामगिरी करु शकले नाहीत. 37 धावांवर 2 गडी बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारताचा डाव सावरला. विराटने 79 चेंडूत 66 धावा फटकावल्या. विराट आज खूप संयमाने खेळला. परंतु आज पुन्हा एकदा विराट शतक लगावू शकला नाही. तसेच विराट आज पुन्हा एकदा आदिल रशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. विराट बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या ऋष पंतने इंग्लिश गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. पंतने प्रत्येक गोलंदाजांवर हल्लाबोल केला. ऋषभ पंतने अवघ्या 40 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 77 धावा फटकावल्या. तर के. एल राहुलने आज शतक झळकावलं. राहुलने 114 चेंडूत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 108 धावा फटकावल्या.

के. एल. राहुल बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून तब्बल 11 षटकार ठोकले. पंत बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्याने धावगती कायम ठेवली. पंड्याने 16 चेंडूत 1 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 35 धावा फटकावल्या. पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून पुण्याचे गहुंजे मैदान दणाणून सोडलं. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल पंड्या 12 धावांवर नाबाद राहिला. आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी एकूण 14 षटकार आणि 20 चौकार फटकावले.

दोन्ही संघांना दुखापतीचं ग्रहण
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त आहे तर इंग्लंडचा नियमित कर्णधार ओयन मॉर्गन आणि सॅम बिलिंग्ज दुखापतग्रस्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button