आरोग्य

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत कडक इशारा दिला आहे. दरम्यान, त्यांनी बाहेरील देशांमध्ये कशा पद्धतीने लॉकडाऊन लावण्यात आला आहे, याची माहिती दिली. तसंच विरोधकांवर निशाणा देखील साधला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची, असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोरोनाच्या जागतिक भ्रमणावरून फडणवीसांनी आर्थिक टोला लगावला आहे. युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा! विरोधक वा तज्ज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन करोना थांबविण्यात अधिक मदत करेल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला…पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले…हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’…पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला…डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती…पण, एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज…ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत…पण, २,२०,००० उद्योग आणि ६ लाखांवर कर्मचार्‍यांना मदत, एवढेच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना ८०० युरोंपर्यंत मदत! बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय…पण, २० बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय…पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे…पण, १३ बिलियन युरोचे पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केले…आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत… पण, ७.४ बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय…फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत…पण, ३.४ बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय…अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोरोनाच्या जागतिक भ्रमणावरून आर्थिक टोला लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button