Top Newsआरोग्यशिक्षण

पहिली ते बारावीपर्यंतचे वर्ग २४ जानेवारीपासून पुन्हा सुरु होणार

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं होतं. कालचं त्यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली होती. शाळा २४ जानेवारीपासून सुरु करण्याची विनंती त्यांना केली होती. त्यांनी त्या फाईलला मंजुरी दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारीपासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी २४ जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता हे आमचं प्राधान्य राहिलेलं आहे. स्थानिक स्थितीवर लक्ष ठेवलं पाहिजे. कोरोना स्थितीचा आढावा घेतला पाहिजे. शाळा सुरु करत असताना आपण गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग पाहत आहोत. त्यामुळं शाळा सुरु करत असताना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. पूर्णपणे काळजी घेऊन शाळा सुरु करण्यात याव्यात असं, वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत.

निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात आम्ही येणाऱ्या काळात निर्णय घेणार आहोत. निवासी शाळा किंवा वसतीगृहात गेल्या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाला होता. त्यामुळं निवासी शाळा सुरु करण्यासंदर्भात येत्या काळात आम्ही निर्णय घेणार आहोत. शाळा सुरु करण्यासाठी आम्ही शिक्षणतज्ज्ञ, टास्क फोर्स आणि शिक्षण विभागातालील अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्याच्या फाईल वर सही केली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देणार

कोरोना रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी शाळा सुरु करण्याचे अधिकार हे स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. शाळा सुरु करण्याबाबत जारी करण्यात आलेली नियमावली जिथं पाळली जाईल तिथेच शाळा सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

महाविद्यालयांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे !

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शाळांबरोबरच महाविद्यालये सुरू करण्यासाठी कॅबिनेटमध्ये निर्णय होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला जाईल, असं उदय सामंत म्हणाले. कोरोना विषाणू संसर्ग अद्यापही सुरु आहे. कोरोना संसर्ग संपलेला नाही त्यामुळं निर्बंध आणि नियम लागू करुनच महाविद्यालय सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.
महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात प्रत्येक जिल्हाधिका-यांना स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील. मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव आम्ही पाठवतोय. त्यांच्या आदेशानंतरच हा निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.

कोरोनाचा धोका अजून गेलेला नाही, त्यामुळं निर्बंध लादूनच कॉलेज सुरू केली जातील, असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय. १५ फेब्रुवारीपर्यंत होणा-या सर्व परिक्षा ऑनलाईनच होतील, यावर आम्ही ठाम आहोत, असंही त्यांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button