नवी दिल्ली : सीबीएसई बारावी बोर्डाच्या परिक्षांमध्ये गेली अनेक दिवस संभ्रम सुरु आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसई बारावी बोर्डाच्या बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक येत्या १ जून रोजी घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे सीबीएसई बारावी बोर्डाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षांचा कालावधी दीढ तास कमी करण्यात आला आहे. त्यामुळे १२ वीच्या परीक्षांचे पेपर केवळ ३० मिनिटांचे असणार आहेत. उच्चस्तरीय बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षांचे प्रारुप आणि तारखा १ जून रोजी जाहीर करु असे सांगितले आहे.
सीबीएसई बारावी बोर्डाच्या बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा या अर्धा तासांच्या घेण्यात येतील. या परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ (MCQ Type Questions) प्रश्न विचारण्यात येतील,अशी शक्यता आहे. परंतु शिक्षण मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. केवळ अधिकृत परीक्षेंच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा करा, असे सीबीएसई बारावी बोर्डाच्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले आहे.
सीबीएसई बारावी बोर्डाच्याने बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी शिक्षण मंत्रालयात दोन पर्याय प्रस्तावित केले होते. एक होता तो म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ १९ महत्त्वाच्या विषयावर परीक्षा घेण्यात येईल. ज्यात प्रत्यक्ष परीक्षेचे प्रारुप आणि परीक्षा केंद्र समान असेल. दुसऱ्या पर्यायात केवळ ९० मिनिटांची परीक्षा असेल जी विद्यार्थी होम सेंटरवर राहून देऊ शकतात.
केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ३२ राज्य १२ केंद्रशासित प्रदेशांनी बारावीची परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शवली. दिल्ली, महाराष्ट्र, गोवा आणि अंदमान निकोबार या चार राज्यांनी परीक्षा घेण्याआधी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या लसीकरणाची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे शॉर्ट फॉर्मेट परीक्षेवरही अनेक राज्यांनी सहमती दर्शवली आहे. ३२ पैकी २९ राज्यांनी शॉर्ट फॉर्मेट परीक्षेला समंती दिली आहे.