Top Newsराजकारण

राजकारणात शेतकऱ्यांचा बळी देऊ नका; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

नांदेड : वाशिम, हिंगोली आणि नांदेड दौऱ्यासाठी फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यानंतर लातुर, उस्मानाबाद असा दौरा असणार आहे. केंद्र सरकारकडे बोट दाखवून प्रश्न सुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तुमच राजकारण जरूर होईल, पण शेतकऱ्याचा बळी जाऊ देऊ नका. या दौऱ्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहे. या दौऱ्यानंतर लोकांचे काय म्हणणे आहे, हेदेखील शेतकऱ्यांना सांगणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी सत्ताधारी बोट दाखवत आहेत. पण आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस वाशिम जिल्ह्यातील शिवणी रोड तसेच पिंप्री येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानाची व्यथा ऐकून घेण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले पहायला मिळाले. विमान कंपन्यांच्या कारभारावर त्यांनी टीका केली. त्याचवेळी अधिकाऱ्यांनाही कडक कारवाई करण्याच आदेश दिले.

खरोखरच संकट भीषण आहे आणि शेतकरी फार चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभे आहोत, हे चित्र निर्माण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना सगळच गेल्याची भावना निर्माण झाली आहे. यंदा शेतकऱ्यांना चांगल पीक आल होत. पीक पुर्णपणे गेल्याने त्याची चिंता फारच वाढलेली आहे. त्यामुळेच शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वाशिम जिल्ह्यातील शिवणी रोड तसेच पिंप्री दौऱ्यावर आहेत. त्यांनी पावसाच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतीची आज पाहणी केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राजेंद्र पाटणी आणि इतर सहकारी त्यांच्यासोबत आहेत. नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. २५ टक्के नुकसान झाले तरीही इन्शुरन्स करावा लागतो. आपल्या तर करारात इन्शुरन्स आहे, का नाही देत ते ? कराना त्यांच्यावर कडक कारवाई असे कसे चालेल ? आपल्या सरकारच्या काळात ३०० कोटी ते ४०० कोटी रूपये एका जिल्ह्याला दिलेत. आता एकही पैसा मिळत नाही म्हणजे काय ? असेही फडणवीस म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button