
मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सरकारच्या स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणती भूमिका पार पाडली याची सविस्तर माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा हात मी सक्तीने वर केला. त्यामुळे त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली, असे शरद पवार यांनी सांगितले. मात्र, याच वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. त्यांनी थेट महाभारताचा दाखला देत साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती ! असं मिश्किल भाष्य केलं.
“द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा ? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.