Top Newsराजकारण

फडणवीसांच्या ‘मन की बात’चा पंकजा मुंडेंना ‘आनंद आहे !’

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर पत्रकारांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात? असा सवाल केला. त्यावर पंकजा मुंडे यांनी हसून उत्तर दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

औरंगाबादमध्ये ओबीसींच्या विभागीय मेळाव्याला संबोधित केल्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘चांगली गोष्ट आहे. आनंद आहे. एखाद्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. लोकांचं प्रेम मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे’, असं पंकजा म्हणाल्या.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असं फडणवीस म्हणाल्याचं पंकजा यांना पत्रकारांनी सांगितलं. तुम्ही असं आजही म्हणता की, तुम्ही जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहात? असा सवालही त्यांना केला. त्यावर पंकजा यांनी लगेच त्यावर हसून हरकत घेतली. ‘जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही’, असं त्या म्हणताच एकच खसखस पिकली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button