महाराष्ट्रात ४७ लाख लोकांना लसीचे दोन्ही डोस
नवी दिल्ली : महाराष्ट्राने कोरोना लसीकरण मोहिमेत सगळ्या राज्यांना मागे टाकले आहे. राज्यात २.४० कोटींपेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या, तर ४७.८३ लाखांपेक्षा जास्त लोकांना लसीच्या दोन्ही मात्रा दिलेले राज्य बनले आहे. आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २.४१ कोटींपेक्षा जास्त लस मात्रा दिल्या गेल्या. त्यात १.९३ कोटी लोकांना कमीत कमी एक मात्रा दिली गेली, तर ४७.८३ लोकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. ४५ ते ६० वयोगटात दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाला मंजुरी मिळाली. परंतु, या वर्गात सर्वांत जास्त ८४.३३ लाख मात्रा दिल्या गेल्या.
६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना ६९.४३ लाख आणि १८ ते ४४ वयोगटात ३९.७० लाखांपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या. ८९.६२ लाख महिलांना लसीची एक मात्रा दिली गेली आहे. ६ जूनपर्यंत अशा पुरुषांची संख्या १.०३९ कोटी होती. एकूण लसीकरणात कोविशिल्डच्या २.११ कोटींपेक्षा जास्त मात्रा दिल्या गेल्या आहेत. या मात्रा २९.५४ लाख कोव्हॅक्सिन मात्रांच्या तुलनेत बऱ्याच जास्त आहेत.
राज्यात रविवारी लसीकरणाचा वेग अपेक्षापेक्षा मंद होता. दुपारपर्यंत १६५७ केंद्रांवर फक्त ८१,८०३ मात्रा दिल्या गेल्या. शनिवारी लस घेणाऱ्यांची संख्या ३.४९ लाख होती. त्या दिवशी ३८२२ सरकारी आणि ३४७ खासगीसह एकूण ४१६९ केंद्रांवर लसीकरण केले. या दरम्यान ३९८ जणांना लस घेतल्यानंतर गंभीर तक्रारी होत्या. राज्यात लसीकरण मोहिमेत हे प्रमाण फक्त.०२१ टक्के आहे.
मुंबईत सर्वाधिक लसीकरण
ज्या जिल्ह्यांत सर्वाधिक लस मात्रा दिल्या गेल्या, त्यात मुंबई (३७.०१ लाख), पुणे (३१.०७ लाख) आणि ठाण्याचा (१८.२० लाख) समावेश आहे. नागपूर १३.१७ लाख, कोल्हापूर १२.०५ लाख, नाशिक १०.४२ लाख आणि साताऱ्यात ७.८३ लाख लस मात्रा दिल्या गेल्या. औरंगाबाद ६.२५ लाख, हिंगोली १.४५ लाख, गडचिरोली १.७१ लाख आणि सिंधुदुर्ग येथे २.२६ लाख लस मात्रा दिल्या.