नारायण राणेंच्या अधीश बंगल्यावर आज महापालिकेची कारवाई ?
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. पण, या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेऊन शिवसेना आणि मातोश्रीवर गंभीर आरोप केले आहे. आता मुंबई पालिकेनंही नारायण राणे यांच्या अनधिकृत बंगल्यावर कारवाई करण्याचा चंग बांधला आहे.
राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. या तक्रारीनंतर बंगल्याची तपासणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. अंधेरी जुहू येथील तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. १८ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतरा पुन्हा एकदा सोमवारी सकाळी १० दहा वाजता महापालिका पथक सांताक्रुज पोलीस स्टेशन येथे रवाना होणार आहे. त्यानंतर तिथून सकाळी ११ वाजता जुहू येथे पोहोचणार आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या बंगल्यावर काय कारवाई होते हे पाहण्याचे ठरणार आहे.
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू इथं अधीश बंगला आहे. या बंगल्याबाबत अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार होती. तारा रोडवर उभारण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामांमुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचं पथकाने १८ फेब्रुवारी रोजी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली आणि नोटीसही बजावली. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली.
संतोष दौंडकर यांनी आरोप केला आहे की, नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले आहे. तसेच कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन करुन हा बंगला बांधण्यात आला असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत समुद्रापासून ५० मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आला असल्याचंही संतोष दौंडकर यांनी म्हटलं आहे.