राजकारण

भाजपने जळगाव महापालिका गमावली; शिवसेना-राष्ट्रवादीचा सर्जिकल स्ट्राईक

जळगाव : भाजपने सांगलीपाठोपाठ जळगाव महानगरपालिकेची सत्ता देखील गमावली आहे. शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन जळगावच्या नव्या महापौर झाल्या आहेत. जयश्री महाजन यांना ४५ मत पडली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना ३० मतं पडली. जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजप मधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याने महापौर शिवसेनेचाच होणार असा दावा करण्यात येत होता. दरम्यान हा पराभव भाजपचे आमदार गिरीश महाजन यांना धक्का मानला जात आहे.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसनं जयंत पाटलांच्या नेतृत्त्वात ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीनं शिवसेनेनं जळगाव महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे सलग दुसरी महापालिका भाजपच्या हातातून निसटली आहे. जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी आज ऑनलाईन निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा तब्बल १५ मतांनी पराभव करत बाजी मारली. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली, तर प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेनेचा भगवा फडकला.

इतिहासात पहिल्यांदाच जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एमआयएम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले. त्यामुळे मतदानाच्या वेळी शिवसेनेला 45 तर भाजपला 30 मते मिळाली. जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र, असं असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली. हे शक्य कसं झालं याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले की, गेल्या दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. यावेळी सर्वसामान्य चर्चा झाली. जळगावमध्ये काय सुरु आहे, परिस्थिती कशी आहे, याबाबत चर्चा झाली. जळगावची सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. रस्ते चांगले नाहीत. पाण्याची दुरावस्था आहे. लक्ष द्यायला कुणी तयार नाही. नगरसेवकांवर लोकांची नाराजी आहे. अशा परिस्थितीत जनता वेठीस धरते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करावा, असं मी मुख्यमंत्र्यांना सूचवलं. फक्त जळगावात लोकांची प्रश्न सूटली पाहिजेत, असं मी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं”, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं
मी मुख्यमंत्र्यांना, मंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं, 15 तुमचे आहेत. 25 माझ्याकडे येतील. 40 नगरसेवक होऊ शकतात. 3 एमआयएमचे आधीच आले होते. बंडखोर 22 लोकं होते. ते जवळपास महिन्याभरापासून माझ्या आणि माझ्या दोन कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. पंधरा दिवसांपूर्वी ते दोन वेळा मला भेटले. पण ते एकट्याने शक्य नव्हतं. म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन त्यांच्या मदतीने हा विषय पुढे आला होता. हा विषय आता पूर्णत्वास आला आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे जास्त अपेक्षा आहेत. बाकीच्यांना हे विषय माहितही नव्हते. चार-पाच विषयांच्यापलिकडे हा विषय गेला नाही. नंतर गुलाबराव पाटलांना आम्ही हा विषय सांगितला. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना गोळा करुन हे सर्व जुळवून आणले. विकासकामे व्हावे अशी आमची मागणी आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, मी, खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्या चौघांचा शिवसेनेचा महापौर करायचा असा निर्णय झाला. बरेचसे नाराज नगरसेवक होते. माझ्याकडे जवळपास 20 ते 22 नाराज नगरसेवक होते. ते नाराज असल्याने त्यांनी स्वत:हून पाठिंबा देण्याचं मान्य केलं. ठेकेदार पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यावर नगरसेवक नाराज होते. त्यामुळे नाराज नगरसेवक एकत्र आले. सर्व शिवसेनेकडे गेल्यानंतर बाकिच्या लोकांच्या मदतीने आज शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. तर बाकीचे बंडखोर आहेत, असं खडसे म्हणाले.

शिवनसेनेने सर्व 30 बंडखोर नगरसेवकांना ठाण्यातील एका हॉटेलमध्ये गेल्या दोन दिवसापासून ठेवलेण्यात होते. इथूनच ऑनलाईन पद्धतीने मतदान पार पडले. या मतदानानंतर जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौरपदी तर कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button