राजकारण
नाना पटोलेंचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे यांचा भाजपत प्रवेश
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे महाराष्ट्राचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे आदी नेते उपस्थित होते.