‘डर्टी अॅप’ची पडद्यामागील कहाणी; राज कुंद्रानंतर आणखी एकाला अटक
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म बनवण्यासाठी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सॉफ्ट पॉर्न फिल्म बनवण्याशिवाय राज कुंद्रा हा हे सगळे अॅपवर अपलोड करायचा, असाही आरोप आहे. राज कुंद्रा याच्याविरूद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याचा दावा आहे. व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथ यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, राज कुंद्राला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक करण्यात आली आहे. रायन जॉन थार्प असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आलेली आहे. यातील काही जामीनावर सुटले आहेत.
फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबईत गुन्हे शाखेने सॉफ्ट अश्लील चित्रपट बनविण्याबद्दल आणि काही अॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याच्या चौकशीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले. अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्सवर दाखविल्याचा आरोप कुंद्रावर आहे. गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता आणि आता राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.
शर्लिन चोप्राचा राज कुंद्रावर आरोप
सॉफ्ट पोर्नोग्राफीसंबंधी चित्रपट बनविणे आणि अपलोड करण्यासाठी मुंबई पोलिसांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. २६ मार्च रोजी मुंबई पोलिसांनीही याच प्रकरणात एकता कपूर यांचे निवेदन घेतले होते. महाराष्ट्र सायबर सेलने यापूर्वी शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांचा जबाब नोंदविला गेला. राज कुंद्रा याच्या विरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात आयटी कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे आहेत. एफआयआरनुसार राज कुंद्रा याचे नाव शर्लिन चोप्रा हिने या प्रकरणात पोलिसांसमोर घेतले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शर्लिन चोप्रा सांगते की राज कुंद्रानेच तिला व्यवसायात (सॉफ्ट अश्लील फिल्म) आणले. शर्लिन चोप्रा हिला प्रत्येक प्रकल्पासाठी ३० लाख रुपयांचे पैसे दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे १५ ते २० प्रकल्प केले आहेत.
हे चित्रपट कोठे आणि कोण अपलोड करायचे याविषयी आता पोलिसांना नवीन माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट देशातून नव्हे तर परदेशातून अपलोड केले गेले होते आणि राज कुंद्र याच्या जवळच्या मित्राने अपलोड केले होते. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासणीनुसार लंडनमधून सॉफ्ट अश्लीलतेशी संबंधित चित्रपट अपलोड करण्यात आले होते आणि हे काम उमेश कामथ नावाच्या व्यक्तीने केले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश कामथ यांने अॅप अॅप्लिकेशन बेस वेबसाइटवर नवीन अभिनेते आणि अभिनेत्रींवर चित्रित केलेले व्हिडिओ देखील अपलोड केले होते. पोलिसांनी असेही म्हटले आहे की, आतापर्यंत ९० पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ शूट केले गेले आहेत आणि ते अपलोड केले गेले आहेत. सॉफ्ट पोर्नोग्राफीचा हा संपूर्ण खेळ सर्वप्रथम चर्चेत आला जेव्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनेत्री गेहना वसिष्ठ हिला अटक केली. गेहना वशिष्ठ हिच्या अटकेनंतर या प्रकरणातील थर हळूहळू उलगडण्यास सुरुवात झाली होती. या मुख्य प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून राज कुंद्र याला अटक करणे ही या संपूर्ण प्रकरणातील शेवटची लिंक आहे की आणखी यात कोण आहे, याची माहिती उघड होण्याची शक्यता आहे.
पोर्नोग्राफिक चित्रांचे शूटिंग सुरू असलेल्या या अश्लील चित्रपटाचे रॅकेट चालविण्यासाठी मुंबईतील मढ येथे एक बंगला भाड्याने घेण्यात आल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी येथे छापा टाकला त्यावेळीही अश्लील चित्रपटांचे शूटिंग सुरू होते. हे अश्लील चित्रपट आणि व्हिडिओ एका नव्हे तर बर्याच साइटवर अपलोड केले गेले आणि पैसे कमावले.