स्वातंत्र्यदिनी मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : स्वातंत्र्यदिनी जळगावच्या शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. सध्या या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर काही वेळानंच हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली.
शेतकरी जळगाव जिल्ह्यातला असल्याचं सांगितलं जातंय. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतलंय. आज भारताचा ७५ वा स्वातंत्रदिन, त्याचनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडलं. याचवेळी मंत्रालयाच्या गेटवर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनील गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा या शेतकऱ्याने प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तत्रेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शेतीत मोठं नुकसान झालंय… घर गहाण पडलंय.. मोठी आर्थिक चणचण आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आत्महदनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय.