
मुंबई : आत्मसन्मानाची गोष्ट असते, त्यामुळे किंमत काही असो तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्याची देशभर चर्चा सुरु होती.
त्याबाबत आज पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत म्हणाले, गोष्ट असते ती आत्मसन्मानाची. त्यामुळे किंमत काही असो. तुमच्याकडे सव्वा रुपया, सव्वा कोटी, भरपूर पैसे असतील त्या पैशांवर आमचं घर चालणार नाही. तुम्ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहात.
गुजरातमध्ये सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्सवरुनही संजय राऊतांनी निशाणा साधला. २१ हजार कोटींचं ड्रग्स कुठे पकडतात आणि कुठे जातात हे सगळं आम्हाला माहीत आहे, त्यामुळे सगळं आम्ही योग्य वेळेत काढू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
उद्धव ठाकरे आणि अमित शाह बैठक
प्रत्येक बैठकीत राजकारणाविषयी चर्चा होईल असं काही नसतं. महाराष्ट्रात नक्षलग्रस्त जिल्हे विदर्भात आहेत. त्यांसंदर्भा ही बैठक आहे. मुख्यमंमत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला हजर राहणार आहेत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.




