आर्यन खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर सात आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांची खडाजंगी झाली. आर्यन खानच्या बाजूने अॅड मानेशिंदे यांनी बाजू मांडली. तर एनसीबीच्या बाजूने एएसजी अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान, इतर सात आरोपी तसेच एनसीबीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वरिल निकाल दिला.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून आर्यन खानला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र आठही जणांच्या जामीन अर्जावर उद्या सकाळी ११.०० वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्रही एनसीबी कारागृहातच जाणार आहे.
क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं ७7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावणीत आली होती. ही कोठडी आज संपत असून आज आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.