फोकसराजकारण

आर्यन खानची आजची रात्र देखील तुरुंगातच; जामीन अर्जावर उद्या सुनावणी

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना आजची रात्री आर्थर रोड कारागृहातच काढावी लागणार आहे. कारण, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीत आज आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई आणि मुनमुनचे वकील अली कशिफ यांनी युक्तीवाद केला. आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाल्या असला तरी अद्याप एनसीबीच्या वकीलांचा युक्तीवाद बाकी आहे. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यानं या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या दुपारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्रही कारागृहातच काढावी लागण्याची शक्यता आहे.

आज युक्तिवादादरम्यान अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसीबीने ते केलेले नाही असे हायकोर्टाला सांगितले आहे. ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी एनसीबीने मांडलेल्या कट करस्थानाच्या थिअरीमध्ये आरोपी असलेल्या याच प्रकरणातील दोघांना काल विशेष एनडीपीएस कोर्टानेही जामीन मंजूर केला. क्रूझ परत आल्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी एनसीबीने त्यांना सेवनाच्या आरोपाखाली अटक केली होती. आज उच्च न्यायालयात झालेल्या युक्तीवादावेळी अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी एका मुद्द्यावर आक्षेप नोंदवला. रेव्ह पार्टी प्रकरणात आरोपींना पकडल्यानंतर एनसीबी कडून तातडीने त्यांची रक्त तपासणी करणं गरेजचं असतं. मात्र, या प्रकरणात एनसीबीने आरोपींच्या रक्ताची तपासणी केली नसल्याचा मुद्दा उच्च न्यायालयात उपस्थित केला. एनसीबीच्या दाव्याप्रमाणे, अरबाज मर्चंटने जबाबात चरस बाळगल्याचे मान्य केले आणि आर्यनसोबत सेवन करण्यासाठी जात होतो, असेही मान्य केले. मात्र, त्या जबाबाविषयी त्यानं माघार घेतली आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या तुफान सिंह निवाड्याप्रमाणे एनसीबी अधिकाऱ्यासमोर दिलेला जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. शिवाय त्या जबाबातही केवळ अमली पदार्थ सेवनाविषयी कबुली आहे. त्यामुळे केवळ तेवढेच कलम लागू होते. कट करस्थानाचा भागच नाही असा युक्तिवाद केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button