
नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी आज अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी या दोन युवा नेते आणि काँग्रेस नेतृत्व यांच्यातील चर्चेमध्ये मध्यस्थी केली आहे. दरम्यान, या प्रवेशापूर्वी शहीद भगतसिंग पार्कमध्ये कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासोबत उपस्थित राहून गांधींनी विरोधकांना एक मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
#WATCH | I am joining Congress because I feel that an ideology is trying to ruin the values, culture, history, & future of this country… Crores of youngsters feel that this country can't be saved without saving Congress: Kanhaiya Kumar in New Delhi pic.twitter.com/U3ugNrhSOt
— ANI (@ANI) September 28, 2021
काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमारला काँग्रेसच्या जवळ आणण्यात आमदार शकील अहमद खान यांनी सर्वात मोठी भूमिका बजावली आहे. कन्हैयाशी त्यांचा चांगला संबंध आहे आणि त्यांनीच कन्हैया कुमारची राहुल गांधींशी भेट घालून दिली. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या विरोधातील आंदोलनात शकील बिहारमध्ये कन्हैयासोबत फिरत होते.
Congress party is like a big ship, if it's saved, I believe many people's aspirations, Mahatma Gandhi's oneness, Bhagat Singh's courage & BR Ambedkar's idea of equality will be protected too. This is why I have joined it…: Former CPI leader Kanhaiya Kumar after joining Congress pic.twitter.com/B4vwknab1Z
— ANI (@ANI) September 28, 2021
प्रशांत किशोर यांची महत्वाची भूमिका
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचाही या पक्षप्रवेशात महत्त्वाचा भाग असल्याची माहिती मिळत आहे. खरतर, प्रंशांत किशोर यांच्याच मार्गदर्शनाखाली राहुल गांधी युवा नेत्यांची नवीन टीम बनवत आहेत. त्यात कन्हैया आणि जिग्नेशची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये कन्हैया कुमारचा चांगला फायदा होऊ शकतो.




