राजकारण
राज्य सरकारकडून ओबीसी आयोगावर सदस्यांची नियुक्ती
मुंबई : मुंबई सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून ओबीसी आयोगावर सदस्यांची नियुक्ती, राज्य मागासवर्ग आयोगावर सगळ्यांची नियुक्ती जाहीर, २०१७ साली आयोगाची स्थापना झाली आहे. त्या आयोगावर सदस्य नियुक्त करण्यात आले. आयोगावर विविध प्रवर्ग आणि सर्व महसुली विभागाला प्रतिनिधित्व देण्यात आलंय. आयोगावर सदस्य म्हणून नियुक्त केलेल्यांमध्ये प्रा. बबनराव तायवडे, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, अॅड. बालाजी किल्लारीकर,प्रा. संजीव सोनावणे, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलीमा सराफ, डॉ. गोविंद काळे, प्रा. लक्ष्मण हाके, ज्योतिराम चव्हाण यांचा समावेश आहे.