राजकारण

समीर वानखेडेंना पहिला धक्का; सत्र न्यायालयाने याचिका फेटाळली!

मुंबई : एनसीबीच्या समीर वानखेडेंना सत्र न्यायालयाने आज मोठा धक्का दिला आहे. आर्यन खान प्रकरणातील महत्वाचा साक्षीदार पलटल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी एनसीबीने सत्र न्यायालयात आज सकाळी केली होती. यावर कोर्टाने या साक्षीदाराविरोधात निर्णय देण्याचे आपल्या अधिकारात येत नसल्याचे सांगत ही मागणी फेटाळली आहे.

प्रभाकर साईल यानं क्रूझ पार्टीवरील कारवाईवेळी आपण किरण गोसावीसोबत उपस्थित होतो आणि प्रकरणाचा साक्षीदार म्हणून माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे एनसीबीची आता मोठी कोंडी झाली आहे. तसेच समीर वानखेडेंना २५ कोटींपैकी ८ कोटी रुपये दिले जाणार होते. सॅम नावाच्या व्यक्तीशी गोसावीची भेटही झाली होती. ते एका निळ्या कारकडे गेले, त्या कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी देखील होती असा दावा प्रभाकरने केला आहे. याचे अ‍ॅफिडेविट त्याने कोर्टात दाखल केले आहे.

साक्षीदाराने केलेल्या आरोपावर समीर वानखेडे सोमवारी सकाळी सेशन कोर्टात गेले होते. त्याठिकाणी वानखेडे यांनी प्रभाकर साईलने कोर्टात तक्रार का केली नाही? असं म्हटलं आहे. प्रभाकर साईलनं २२ दिवसांनी हा आरोप का केला? असा सवाल समीर वानखेडे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत विचारला होता. तसेच वारंवार माझ्यावर वैयक्तिक हल्ले करण्यात येत आहेत. मला धमक्या दिल्या जात आहेत. माझ्यावर राजकीय पक्षाचा दबाव आहे. माझ्यावर चुकीचे आरोप करुन बदनामी केली जातेय. ज्या महिलेसोबत माझा घटस्फोट झालाय तिच्यासोबतचा फोटो कुणाच्या परवानगीने व्हायरल करण्यात आले? एका घटस्फोटित महिलेलाही सोडलं गेलं नाही. इतक्या खालच्या पातळीवर आरोप होत आहेत असंही समीर वानखेडे यांनी म्हटले होते.

यावर सेशन कोर्टाने आर्यन खानच्या जामिनावरील याचिका आता हायकोर्टात दाखल झाली आहे. यामुळे या प्रकरणी आम्ही कोणताही आदेश जारी करू शकत नाही. आता हे प्रकरण आमच्या अधिकारात येत नसल्याने कोणतीही कारवाई करू शकत नसल्याचे उत्तर सेशन कोर्टाने एनसीबीला दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button